Sunday, 1 August 2021

नाचू किती नाचू किती कंबर लचकली

(लगबग लगबग, बिगी बिगी बिगी, थुई-थुई नाचत आली)

हा...नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली

ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली
बाई माझी जोडवी टचकली

हाय..नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली....

(बाजारपेठ ही कोल्हापूरची, काय मी म्हणू हिला,
नखरेल नार ही सोळा गाठ की दिसली खरी कला)

आई गं ,नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली ईई
नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
🌷स्वर-आशा भोसले🌷
हे ज्वानीच चाललं गुऱ्हाळ 
(चाललंय गुऱ्हाळ, चाललाय गुऱ्हाळ, पोट भरलं)
बारा गावाचं जमलंय दलाल
(जमलय दलाल, जमलय दलाल, पोट भरलं)
हो...काहील भरली, उकळी फुटली
(लई जण हरकली)

हं..नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली 
ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली
बाई माझी जोडवी टचकली
हं..नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
या सुटल्या हो गाड्या कश्या हो
(गाड्या कश्या हो, गाड्या कश्या हो, पोट भरलं)
कुणी डागल्या हो, तोफा जश्या हो
(तोफा जश्या हो, तोफा जश्या हो, पोट भरलं)
हो...गाडीचा अड्डा, सुगंधी कट्टा 
(दुनिया हबकली)
हं...नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली
बाई माझी जोडवी टचकली
हं...नाचू किती नाचू किती कंबर लचकली ईई
नाचू किती नाचू किती कंबर लचकली
🙏 धन्यवाद 🙏

तुमच्या पुढ्यात कुटते मी

🌷स्वर-शैला चिखले🌷
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
भिर भिर फिरतय पाखरावानी... 
कुठच दाना मिळंना..
अहो ,भरलय कणीस तुमच्या बाजुला...
कसं तुम्हाला कळना........
काखेत कळसा गावला वळसा कशाला, 
बोला......
अहो,काखेत कळसा गावला वळसा कशाला हा 
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, ज्वानीचा मसाला आ..
(जीरं जी जी जी ,हेरं जी जी जी जी
हेरं जी जी जी जी, हेरं जी जी जी जी)
वय नुकतंच लागलय सोळा
नका घालू हो इतक्यात डोळा.....
वय नुकतंच लागलय सोळा
नका घालू हो इतक्यात डोळा
जीव धकधक करतोय खुळा
हिरवा गार गार झालाय मळा ,
नका घाबरू पावन 
भाव लय आलाय ऊसाला ,
बोला......
नका घाबरू पावन भाव लय आलाय ऊसाला हा 
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, 
ज्वानीचा मसाला आ... 
💃💃💃💃💃💃💃
मला कराहो आपली राणी
तुमच्या घरात भरीन पाणी,
(जी जी जीजी,हेरं जी जी जीजी)
मला कराहो आपली रानी 
तुमच्या घरात भरीन पाणी,
असं बघु नका खुळ्या वाणी
माझं बोलणं आणा हो ध्यानी
रात लय झाली हात माझा घ्या हो ऊशाला, 
घ्याकी.....
अहो, रात लय झाली हात माझा घ्या हो ऊशाला आ
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, 
ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, 
ज्वानीचा मसाला हा आ
💃💃💃💃💃💃💃💃
🙏 धन्यवाद 🙏

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण

🙏🌷🙏🌷🙏
बांधले मी बांधले, बांधले...
बांधले, मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले
बांधले...
शिंपण घातले, शिंपण घातले
चाफ्याचे शिंपण घातले, बांधले...
बांधले, मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले
बांधले...
🌷स्वर-आशा भोसले🌷
उन्हाचे,पाटव,नेसले टाकले ऐऐ
वाऱ्याचे,पैंजण,घातले फेकले ऐऐ
उन्हाचे,पाटव,नेसले टाकले ऐऐ
वाऱ्याचे,पैंजण,घातले फेकले
डोळ्यां..त काजळ, केवडा, अत्तर
डोळ्यांत काजळ, केवडा अत्तर
ला..वले, पुसले,बांधले...
बांधले, मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले 
बांधले...
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
हर्षाचे हिंदोळे,सोडले बांधले ऐऐ
हर्षाचे हिंदोळे,सोडले बांधले
मयूर मनाचे..रुसले, हासले
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे
हिंदोळे हर्षाचे, मयूर मनाचे
हा..सले, नाचले,बांधले...
बांधले, मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले, 
बांधले...
🌹चित्रपट-सर्वसाक्षी🌹
दिसला, लपला, चकोर मनाचा आआ
फुलला, ढळला, बहर चंद्राचा
लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा
लामण सूर्याचा, श्रावण नेत्राचा
विझले, तेवले,बांधले...
बांधले, मी बांधले, इंद्राचे तोरण बांधले, 
बांधले...
शिंपण घातले..शिंपण घातले
चाफ्याचे शिंपण घातले, बांधले...
🙏 धन्यवाद 🙏

दत्त दर्शनला जायाचं

🌷श्रीदत्त अभंग🌷
🌷स्वर-सुधीर फडके🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
🌹चित्रपट-झुंज🌹
१)हे पत्र माझे त्या धन्याला, 
वैकुंठवासी रहातो तयाला
अन् पत्राचा मजकूर वाचुनी पाहिला, 
भक्तसंकटी.. धावुनी आला
ही वेडीवाकुडी सेवा माझी 
मान्य करूनि प्रभु घेतील का
आणि अज्ञान मूढ..बालक म्हणुनी 
हात मस्तकी..धरतील का

२)हाहाहा...तुझे भजन कसे करावे 
ठाऊक मजला नाही
आणि तुझे भजन तूच करून घे 
कलावान मी नाही
अहो कोणी माना कोणी मानू नका 
यात अमुचे का..य
आणि भगवंताची सर्व लेकरे 
एक पिता.. एक माय
१)बोला श्री दत्त गुरु महाराज की, जय.. 
दत्त दर्शनला जायाचं जायाचं नि जायाचं,
आनंद पोटात माझ्या (काय वाडीला?)
आनंद पोटात माझ्या (आरं औदुंबर )
आनंद पोटात माझ्या (आरं गाणगापूर राहीलं की)

आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 
२)दत्त दर्शनला जायाचं जायाचं नि जायाचं 
आनंद पोटात माझ्या माईना हो माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 

१)गेलो गानगापुरी थेट,घेतली दत्ताची भेट
२)घेतली दत्ताची भेट,घेतली दत्ताची भेट
१)हो, गेलो गानगापुरी थेट,घेतली दत्ताची भेट
२)घेतली दत्ताची भेट,घेतली दत्ताची भेट
१)या या नजरेची
या या नजरेची हौस पुरी होईना 
या या नजरेची हौस पुरी होईना होईना 
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 
२)दत्त दर्शनला जायाचं जायाचं नि जायाचं 
आनंद पोटात माझ्या माईना हो माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 

१)रूप सावळं सुंदर,गोजिरवाणं मनोहर
२)गोजिरवाणं मनोहर,गोजिरवाणं मनोहर
१)रूप सावळं सुंदर,गोजिरवाणं मनोहर
२)गोजिरवाणं मनोहर,गोजिरवाणं मनोहर
१)नजरेस,नजरेस आणिक काही येईना
नजरेस आणिक काही येईना येईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 
२)दत्त दर्शनला जायाचं जायाचं नि जायाचं 
आनंद पोटात माझ्या माईना हो माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 

१)हरी हाच पांडुरंग,दत्त गारुडी अभंग
२)दत्त गारुडी अभंग,दत्त गारुडी अभंग
१)हरी हाच पांडुरंग,दत्त गारुडी अभंग
२)दत्त गारुडी अभंग,दत्त गारुडी अभंग
१)या या भजनाची 
या या भजनाची हौस पुरी होईना
या या भजनाची हौस पुरी होईना होईना 
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 
२)दत्त दर्शनला जायाचं जायाचं नि जायाचं 
आनंद पोटात माझ्या माईना हो माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 

१)नजरबंदीचा हा खेळ,खेळे सद्गुरू प्रेमळ
२)खेळे सद्गुरू प्रेमळ,खेळे सद्गुरू प्रेमळ
१)हो, नजरबंदीचा हा खेळ,खेळे सद्गुरू प्रेमळ
२)खेळे सद्गुरू प्रेमळ,खेळे सद्गुरू प्रेमळ
१)खेळ खेळता
खेळ खेळता,खेळ पुरा होईना
खेळ खेळता,खेळ पुरा होईना होईना 
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 
२)दत्त दर्शनला जायाचं जायाचं नि जायाचं 
आनंद पोटात माझ्या माईना हो माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना 
🙏 धन्यवाद 🙏

देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा

🌷गवळण गीत🌷
🌹चित्रपट- देवघर🌹
🌷स्वर-जयवंत कुलकर्णी🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
१)देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा
देवकीचा का..न्हा यशोदेचा तान्हा
माया ममतेचा धागा जोडतो,जोडतो 
बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो 
बाळकृष्ण गोकुळात वाढतो...

२)देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा 
देवकीचा का..न्हा यशोदेचा तान्हा
माया ममतेचा धागा जोडतो,जोडतो 
बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो 
बाळकृष्ण गोकुळात वाढतो
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
१)हरिणीचा पाडस हा,गाऊलीचा बछडा 
अंगणात रांगतो हा,देवाचा छकडा हो, 
२)हरिणीचा पाडस हा,गाऊलीचा बछडा 
अंगणात रांगतो हा,देवाचा छकडा
१)खेळ असा मोडूनिया मांडतो,मांडतो 
१+२)बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो 
बाळकृष्ण गोकुळात वाढतो
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
१)दुडुदुडु पळतो हा,राजा वनमाळी 
दृष्ट याची कुणी काढा ,तीटं लावा गाली हो 
२)दुडुदुडु पळतो हा,राजा वनमाळी 
दृष्ट याची कुणी काढा ,तीटं लावा गाली
१)याच्याकडे जीव कसा ओढतो,ओढतो 
१+२)बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो 
बाळकृष्ण गोकुळात वाढतो...

१)देवकीचा कान्हा,यशोदेचा तान्हा
देवकीचा का..न्हा,यशोदेचा तान्हा
माया ममतेचा धागा जोडतो जोडतो 
१+२)बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो 
बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो 
🙏 जय श्रीहरी 🙏

Saturday, 31 July 2021

एक तत्त्व नाम दृढ धरी मना

पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, सावता माळ्याच्या मळ्यामधी रे 
बांधी भाजीच्या जुड्या जुड्या रे 
सावता माळ्याच्या मळ्यामधी रे 
बांधी भाजीच्या जुड्या जुड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, गोरा कुंभाराच्या चिखला मधी रे 
प्रेमे मारीशी उड्या उड्या रे 
गोरा कुंभाराच्या चिखला मधी रे 
प्रेमे मारीशी उड्या उड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, कबीरा घरचे शेले विणोनी रे 
त्याच्या घालीशी घड्या घड्या रे 
कबीरा घरचे शेले विणोनी रे 
त्याच्या घालीशी घड्या घड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, तुकारामाच्या गाथेमधी रे 
लावी शब्दाच्या जोड्या जोड्या रे
तुकारामाच्या गाथेमधी रे 
लावी शब्दाच्या जोड्या जोड्या रे

पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
🙏 धन्यवाद 🙏
🙏 सौजन्य रविंद्र झांबरे 🙏

पंढरीचा पाटील विठोबा

पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, सावता माळ्याच्या मळ्यामधी रे 
बांधी भाजीच्या जुड्या जुड्या रे 
सावता माळ्याच्या मळ्यामधी रे 
बांधी भाजीच्या जुड्या जुड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, गोरा कुंभाराच्या चिखला मधी रे 
प्रेमे मारीशी उड्या उड्या रे 
गोरा कुंभाराच्या चिखला मधी रे 
प्रेमे मारीशी उड्या उड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, कबीरा घरचे शेले विणोनी रे 
त्याच्या घालीशी घड्या घड्या रे 
कबीरा घरचे शेले विणोनी रे 
त्याच्या घालीशी घड्या घड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, तुकारामाच्या गाथेमधी रे 
लावी शब्दाच्या जोड्या जोड्या रे
तुकारामाच्या गाथेमधी रे 
लावी शब्दाच्या जोड्या जोड्या रे

पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
🙏 धन्यवाद 🙏
🙏 सौजन्य रविंद्र झांबरे 🙏

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले

सावळ्या विठ्ठला,तुझ्या दारी आले
सावळ्या विठ्ठला,तुझ्या दारी आले
विसरुनी गेले देहभान~देहभान
विसरुनी गेले देहभान अअअ
सावळ्या विठ्ठला
🌷स्वर-सुमन कल्याणपूर🌷
गोजिरे हे रूप,पाहुनिया डोळा
दाटला उमा~ळा.. अंतरी माझ्या..
अंतरी माझ्या
तुकयाचा भा~व पाहुनी निःसंग
तारिले अभं~ग तूच देवा
तारिले अभं~ग तूच देवा....
तूच देवा आआ
सावळ्या विठ्ठला,तुझ्या दारी आले
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
जगी कितीकांना,तारिलेस देवा
आ.. आ.. आ.. आ.. 
जगी कितीकांना,तारिलेस देवा
स्वीकारी ही से~वा,आता माझी ईई
आता माझी
कृपाकटाक्षा~चे पाजवी अमृत
ठेव शिरी हा~त,पांडुरंगा
ठेव शिरी हा~त,पांडुरंगा
पांडुरंगा आआआ
सावळ्या विठ्ठला,तुझ्या दारी आले 
सावळ्या विठ्ठला,तुझ्या दारी आले ऐऐऐ
तुझ्या दारी आले ऐऐ
सावळ्या विठ्ठला,तुझ्या दारी आ..ले
🙏पांडुरंग हरि🙏

भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला

🌷 स्वर-शकुंतला जाधव 🌷 
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी

( तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी 
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी )
                       🎵
तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट....
तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट
भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी 
भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी 
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी 
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी 
( तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी 
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी )
                       🎵
एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली
कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली....
एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली
कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली
संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी 
संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी 
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी 
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी 
( तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी )
                       🎵
सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई
त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई....
सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई
त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई 
हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी
हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी
धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी
( तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी 
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी )
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी 
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी 
धनी मलाही दाखवा विठूरायाची पंढरी
धनी मलाही दाखवा विठूरायाची पंढरी
( तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी 
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी 
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी 
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी )
🙏 धन्यवाद 🙏

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा

🙏🌹गुरुपौर्णिमा 🌹🙏
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा 
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 

( गुरूने दिला ज्ञानरूपी वसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा )
🌷 स्वर-अनुराधा पौडवाल 🌷
पिता-बंधू-स्नेही तुम्ही माऊली 
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली 
( पिता-बंधू-स्नेही तुम्ही माऊली 
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली )
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा 
(आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा )
🌹चित्रपट-कैवारी 🌹
जिथे काल अंकुर बीजातले 
तिथे आज वेलीवरी ही फुले 
(जिथे काल अंकुर बीजातले 
तिथे आज वेलीवरी ही फुले)
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा )
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
(शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता)
मनी ध्यास हा एक लागो असा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा )
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
जरी दुष्ट कोणी करू शासन 
गुणी सज्जनांचे करू पालन 
(जरी दुष्ट कोणी करू शासन 
गुणी सज्जनांचे करू पालन) 
मनी मानसी हाच आहे ठसा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा )
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
तुझी त्याग सेवा फळा ये अशी 
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
(तुझी त्याग सेवा फळा ये अशी 
तुझी कीर्ती राहील दाही दिशी)
अगा पुण्यवंता भल्या माणसा
अगा पुण्यवंता भल्या माणसा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा 
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा 
आम्ही चालवू हा पुढे वारसा )
🙏 धन्यवाद 🙏

पंचरंगी हे नवीन पाखरू

🌹 चित्रपट-सख्या साजना 🌹
🌷 स्वर-उषा मंगेशकर,अरुण दाते 🌷
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
पंचरंगी हे नवीन पाखरू
आलंय गावात...
पंचरंगी हे नवीन पाखरू
आलंय गावात...
रूप रंग हो तीचं बघुन मी  
पडलोय चक्रात,आहा
रूप रंग हो तीचं बघुन मी  
पडलोय चक्रात
🕺💃🕺💃🕺💃🕺
तशीच झालीया गत हो माझी
दिसता तुम्ही राया...
तशीच झालीया गत हो माझी
दिसता तुम्ही राया
अन कांही सुचेना अन्न रुचेना
दिस जातो वाया
अहो,कांही सुचेना अन्न रुचेना
दिस जातो वाया
💃🕺💃🕺💃🕺💃
बोल ग राणी मंजुळवाणी 
येऊन बस जरा अशी...
आगं,बोल ग राणी मंजुळवाणी 
येऊन बस जरा अशी...
इष्काचा ह्यो भरला पेला 
लज्जत कर खाशी
इष्काचा ह्यो भरला पेला 
लज्जत कर खाशी
🕺💃🕺💃🕺💃🕺
नव्या वळखीचा नवा बहाना
सारयास्नी का सुचतो 
नव्या वळखीचा नवा बहाना
सारयास्नी का सुचतो 
अन हौस भागता चार दिसांन
कट्टाळा  का येतो 
अहो,हौस भागता चार दिसांन
कट्टाळा  का येतो 
💃🕺💃🕺💃🕺💃
ये ग ये ग साळू
दोघंचखेळू 
हात हाती दयावा...
ये ग ये ग साळू
दोघंचखेळू 
हात हाती दयावा...
गुलुगुलु बोलत संगच जाऊ
पिरतीच्या गावा
गुलुगुलु बोलत संगच जाऊ
पिरतीच्या गावा
राणी ग.....
राजा रं....
राणी ग ...
राणी ग...
राजा रं...
राजा रं....
राणी ग...
राजा रं...
🙏 धन्यवाद 🙏 

आवडला मज मनापासूनी

🌹 चित्रपट-धरतीची लेकरं 🌹
🌷 स्वर-सुधीर फडके 🌷
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
तो-आवडला मज मनापासुनी 
गडी तो घोड्यावरचा...
आवडला मज मनापासुनी 
गडी तो घोड्यावरचा
कराडचा की कोल्हापूरचा,
कराडचा की कोल्हापूरचा, 
दिसला,मोठ्या घरचा...
आआआ..आआआ..आआआ....
ती-आआआ..आआआ..आआआ....
तो-ऐन विसाची असेल उमर,
दिसे वाईसा मोठा
ती-गं बाई मोठा 
तो-तंग मलमली कुडता अंगी,
डोईस हिरवा फेटा
ती-गं बाई फेटा 
तो-घोड्यावरची मांड पहाता
ती-आआआ..आआआ..आआआ..
तो-घोड्यावरची मांड पहाता,
जोर उमगला..वरचा
कराडचा की कोल्हापूरचा,
कराडचा की कोल्हापूरचा, 
दिसला मोठ्या घरचा...
आआआ..आआआ..आआआ
ती-आआआ...
तो-आवडला मज मनापासुनी 
गडी तो घोड्यावरचा
              🎵
तो-मान उचलुनी,वर बघवेना,
नजर कहारी भारी
ती-मान उचलुनी,वर बघवेना, 
नजर कहारी भारी
तो-नजरानजरी चुकुन होता उगीच हसली 
ती-स्वारी,बाई उगीच हसली स्वारी 
तो-बाजाराला,जाता जमला
ती-ओ.. ओ.. ओ.. 
तो-बाजाराला,जाता जमला 
शिनवे त्याचा..आमचा
कराडचा की कोल्हापूरचा,
कराडचा की कोल्हापूरचा, 
दिसला मोठ्या घरचा...
आआआ..आआआ..आआआ....
ती-आआआ..
तो-आवडला मज मनापासुनी 
गडी तो घोड्यावरचा
            🎵
तो-नाव न पुशिलं,गाव न पुशिलं,
झाली न बोलाचाली
ती-नाव न पुशिलं,गाव न पुशिलं,
झाली न बोलाचाली
तो-घडू नये ते,घडलं बाई,खूण राहिली 
ती-गाली,बाई खूण राहिली गाली 
तो-दिवसारात्री तसाच दिसतो
ती-हो.. हो.. हो.. हो
तो-दिवसारात्री तसाच दिसतो,
हले न डोळ्यापुढचा
ती-कराडचा की कोल्हापूरचा,
कराडचा की कोल्हापूरचा, 
दिसला मोठ्या घरचा...
आआआ..आआआ..
🙏 धन्यवाद 🙏

येग येग साळू

🌹 चित्रपट-थापाड्या 🌹
(तो) आगं ये..ये 
(ती)आरं जा...
(तो)येग येग साळू जीव नगं जाळू 
येग येग साळू जीव नगं जाळू 
माझा जीव नगं जाळू 
(ती)नगं होरपळू नगं ईंगळाशी खेळू
नगं होरपळू नगं ईंगळाशी खेळू
आरं ईंगळाशी खेळू
(तो)आरारारा, जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(ती)तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(कोरस) 
🌷स्वर-आशा भोसले,जयवंत कुलकर्णी🌷
(ती)तुझ्या पटक्याला तिडा,तो-आं?
साऱ्या गावाला पिडा,तो-माझी?
तुझ्या पटक्याला तिडा साऱ्या गावाला पिडा...
तुझा रुबाब सारा पोकाळ,
न्हाय घरात फाटकी वाकाळ
तुझा रुबाब सारा पोकाळ,
न्हाय घरात फाटकी वाकाळ
(तो) शर्टाला कालर 
ती-असतीया व्हय 
अन् मांडवाला झालंर,ती-बरं मग? 
शर्टाला कालर,अन् मांडवाला झालंर
पिपाणी वाजंल दारा म्होरं 
तुझं हळदीनं माखत्यांल गाल गोरं
आगं,पिपाणी वाजंल दारा म्होरं 
तुझं हळदीनं माखत्यांल गाल गोरं
(ती)लयी लोणी नगं चोळू...
नगं गोंडा बी घोळू 
लयी लोणी नगं चोळू 
नगं गोंडा बी घोळू ...
आधी दांडा बशीव तुझ्या छत्रीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
आधी दांडा बशीव तुझ्या छत्रीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(तो)जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(ती)तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(कोरस)
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
(ती)येऊ नगं नगं, तो-का?
माझ्या मागं मागं, तो-येणार
येऊ नगं नगं 
माझ्या मागं मागं...
बस म्हसूबा होऊन माळावर 
लोक लावतील तोंडाला शेंदूर 
बस म्हसूबा होऊन माळावर 
लोक लावतील तोंडाला शेंदूर 
(तो)नगं चिडवू मला, (ती)का रं? 
अगं, पाटल्या घडवीन तुला, (ती)नगं मला 
नगं चिडवू मला 
पाटल्या घडवीन तुला 
नवं लुगडं घेतो येत्या बेंदराला 
माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला
नवं लुगडं घेतो येत्या बेंदराला 
माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला
(ती)मागं लागलाय वळू, तो-वळू? 
याला कसा टाळू...
मागं लागलाय वळू 
याला कसा टाळू...
जणू बोकड सुटलांय टकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
जणू बोकड सुटलांय टकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(तो)जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(ती)तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(कोरस)
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
(ती)काय बाई कटकट..
सोड माझं मनगट, (तो)- नाय सोडणार 
काय बाई कटकट 
सोड माझं मनगट
बाई गं ....
लाज कशी न्हाई तुला जरा
फुकट दाऊ नगं मला तोरा
लाज कशी न्हाई तुला जरा
फुकट दाऊ नगं मला तोरा
(तो)घरदार ईकून, ती - आता? 
जराशी झोकून, ती-हं 
घरदार ईकून 
जराशी झोकून 
हिसका दावतो तुला मर्दानी 
गपगुमान चल माझ्या बायकोवाणी
आगं,हिसका दावतो तुला मर्दानी 
गपगुमान चल माझ्या बायकोवाणी
                      🎵
(ती)चल दोघं मिळू 
दोन म्हसरं पाळू 
चल दोघं मिळू 
दोन म्हसरं पाळू 
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला 
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला 
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला
🙏 धन्यवाद 🙏

मला हो म्हणतात लवंगी

💃🌹लावणी 🌹💃
नाव गाव कशाला पुसता.. 
अहो मी आहे कोल्हापुरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
🌷स्वर -सुलोचना चव्हाण🌷
हा डौल झोक हा नटा रंगीचा ढंग 
वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग 
हर घडीला नखरा नवा...
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा 
झाकुनी फेकिन नजरेची बरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
हा लाल डाळींबी शालू पदर जरतारी 
ही हिरवी हिरवी चोळी तंग भरदारी 
नका पाहू न्याहाळुन अशी, होहोहोहो.. हो 
नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी 
जणु मी नागीण झाडावरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
💃💃💃💃💃💃💃
या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून 
घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून 
हिरव्या रानात दिसते उठून...
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ खुडून 
अहो मी पाव्हणी बारा घरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
अहो, नाव गाव कशाला पुसता 
अहो मी आहे कोल्हापुरची
अहो मी आहे कोल्हापुरची
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची
🙏 धन्यवाद 🙏