Saturday, 31 July 2021

येग येग साळू

🌹 चित्रपट-थापाड्या 🌹
(तो) आगं ये..ये 
(ती)आरं जा...
(तो)येग येग साळू जीव नगं जाळू 
येग येग साळू जीव नगं जाळू 
माझा जीव नगं जाळू 
(ती)नगं होरपळू नगं ईंगळाशी खेळू
नगं होरपळू नगं ईंगळाशी खेळू
आरं ईंगळाशी खेळू
(तो)आरारारा, जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(ती)तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(कोरस) 
🌷स्वर-आशा भोसले,जयवंत कुलकर्णी🌷
(ती)तुझ्या पटक्याला तिडा,तो-आं?
साऱ्या गावाला पिडा,तो-माझी?
तुझ्या पटक्याला तिडा साऱ्या गावाला पिडा...
तुझा रुबाब सारा पोकाळ,
न्हाय घरात फाटकी वाकाळ
तुझा रुबाब सारा पोकाळ,
न्हाय घरात फाटकी वाकाळ
(तो) शर्टाला कालर 
ती-असतीया व्हय 
अन् मांडवाला झालंर,ती-बरं मग? 
शर्टाला कालर,अन् मांडवाला झालंर
पिपाणी वाजंल दारा म्होरं 
तुझं हळदीनं माखत्यांल गाल गोरं
आगं,पिपाणी वाजंल दारा म्होरं 
तुझं हळदीनं माखत्यांल गाल गोरं
(ती)लयी लोणी नगं चोळू...
नगं गोंडा बी घोळू 
लयी लोणी नगं चोळू 
नगं गोंडा बी घोळू ...
आधी दांडा बशीव तुझ्या छत्रीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
आधी दांडा बशीव तुझ्या छत्रीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(तो)जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(ती)तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(कोरस)
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
(ती)येऊ नगं नगं, तो-का?
माझ्या मागं मागं, तो-येणार
येऊ नगं नगं 
माझ्या मागं मागं...
बस म्हसूबा होऊन माळावर 
लोक लावतील तोंडाला शेंदूर 
बस म्हसूबा होऊन माळावर 
लोक लावतील तोंडाला शेंदूर 
(तो)नगं चिडवू मला, (ती)का रं? 
अगं, पाटल्या घडवीन तुला, (ती)नगं मला 
नगं चिडवू मला 
पाटल्या घडवीन तुला 
नवं लुगडं घेतो येत्या बेंदराला 
माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला
नवं लुगडं घेतो येत्या बेंदराला 
माझ्या लाडक्या लाडक्या सुंदराला
(ती)मागं लागलाय वळू, तो-वळू? 
याला कसा टाळू...
मागं लागलाय वळू 
याला कसा टाळू...
जणू बोकड सुटलांय टकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
जणू बोकड सुटलांय टकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(तो)जरा समजून सांगा या छोकरीला 
मी पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(ती)तुझ्या घरात पीठ न्हाय भाकरीला 
म्हणं पाटलाच्या वाड्याव हाय चाकरीला
(कोरस)
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
(ती)काय बाई कटकट..
सोड माझं मनगट, (तो)- नाय सोडणार 
काय बाई कटकट 
सोड माझं मनगट
बाई गं ....
लाज कशी न्हाई तुला जरा
फुकट दाऊ नगं मला तोरा
लाज कशी न्हाई तुला जरा
फुकट दाऊ नगं मला तोरा
(तो)घरदार ईकून, ती - आता? 
जराशी झोकून, ती-हं 
घरदार ईकून 
जराशी झोकून 
हिसका दावतो तुला मर्दानी 
गपगुमान चल माझ्या बायकोवाणी
आगं,हिसका दावतो तुला मर्दानी 
गपगुमान चल माझ्या बायकोवाणी
                      🎵
(ती)चल दोघं मिळू 
दोन म्हसरं पाळू 
चल दोघं मिळू 
दोन म्हसरं पाळू 
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला 
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला 
(तो)जाऊ जोडीनं दुधाच्या ईक्रीला 
(ती)तू जाऊ नगं पाटलाच्या चाकरीला
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment