🌷गवळण गीत🌷
🌹चित्रपट- देवघर🌹
🌷स्वर-जयवंत कुलकर्णी🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
१)देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा
देवकीचा का..न्हा यशोदेचा तान्हा
माया ममतेचा धागा जोडतो,जोडतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो...
२)देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा
देवकीचा का..न्हा यशोदेचा तान्हा
माया ममतेचा धागा जोडतो,जोडतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
१)हरिणीचा पाडस हा,गाऊलीचा बछडा
अंगणात रांगतो हा,देवाचा छकडा हो,
२)हरिणीचा पाडस हा,गाऊलीचा बछडा
अंगणात रांगतो हा,देवाचा छकडा
१)खेळ असा मोडूनिया मांडतो,मांडतो
१+२)बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
१)दुडुदुडु पळतो हा,राजा वनमाळी
दृष्ट याची कुणी काढा ,तीटं लावा गाली हो
२)दुडुदुडु पळतो हा,राजा वनमाळी
दृष्ट याची कुणी काढा ,तीटं लावा गाली
१)याच्याकडे जीव कसा ओढतो,ओढतो
१+२)बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो...
१)देवकीचा कान्हा,यशोदेचा तान्हा
देवकीचा का..न्हा,यशोदेचा तान्हा
माया ममतेचा धागा जोडतो जोडतो
१+२)बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो,वाढतो
बाळकृष्ण गोकुळात वाढतो
🙏 जय श्रीहरी 🙏
No comments:
Post a Comment