Saturday, 31 July 2021

एक तत्त्व नाम दृढ धरी मना

पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, सावता माळ्याच्या मळ्यामधी रे 
बांधी भाजीच्या जुड्या जुड्या रे 
सावता माळ्याच्या मळ्यामधी रे 
बांधी भाजीच्या जुड्या जुड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, गोरा कुंभाराच्या चिखला मधी रे 
प्रेमे मारीशी उड्या उड्या रे 
गोरा कुंभाराच्या चिखला मधी रे 
प्रेमे मारीशी उड्या उड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, कबीरा घरचे शेले विणोनी रे 
त्याच्या घालीशी घड्या घड्या रे 
कबीरा घरचे शेले विणोनी रे 
त्याच्या घालीशी घड्या घड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 

हे, तुकारामाच्या गाथेमधी रे 
लावी शब्दाच्या जोड्या जोड्या रे
तुकारामाच्या गाथेमधी रे 
लावी शब्दाच्या जोड्या जोड्या रे

पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
पंढरीचा पाटील विठोबा 
धाव गड्या तू पाव गड्या रे 
🙏 धन्यवाद 🙏
🙏 सौजन्य रविंद्र झांबरे 🙏

No comments:

Post a Comment