Saturday, 31 July 2021

मला हो म्हणतात लवंगी

💃🌹लावणी 🌹💃
नाव गाव कशाला पुसता.. 
अहो मी आहे कोल्हापुरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
🌷स्वर -सुलोचना चव्हाण🌷
हा डौल झोक हा नटा रंगीचा ढंग 
वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग 
हर घडीला नखरा नवा...
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा 
झाकुनी फेकिन नजरेची बरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
हा लाल डाळींबी शालू पदर जरतारी 
ही हिरवी हिरवी चोळी तंग भरदारी 
नका पाहू न्याहाळुन अशी, होहोहोहो.. हो 
नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी 
जणु मी नागीण झाडावरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
💃💃💃💃💃💃💃
या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून 
घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून 
हिरव्या रानात दिसते उठून...
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ खुडून 
अहो मी पाव्हणी बारा घरची....
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
अहो, नाव गाव कशाला पुसता 
अहो मी आहे कोल्हापुरची
अहो मी आहे कोल्हापुरची
मला हो म्हणतात लवंगी मिरची 
मला हो म्हणतात लवंगी मिरची
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment