Sunday, 1 August 2021

तुमच्या पुढ्यात कुटते मी

🌷स्वर-शैला चिखले🌷
🙏 सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
भिर भिर फिरतय पाखरावानी... 
कुठच दाना मिळंना..
अहो ,भरलय कणीस तुमच्या बाजुला...
कसं तुम्हाला कळना........
काखेत कळसा गावला वळसा कशाला, 
बोला......
अहो,काखेत कळसा गावला वळसा कशाला हा 
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, ज्वानीचा मसाला आ..
(जीरं जी जी जी ,हेरं जी जी जी जी
हेरं जी जी जी जी, हेरं जी जी जी जी)
वय नुकतंच लागलय सोळा
नका घालू हो इतक्यात डोळा.....
वय नुकतंच लागलय सोळा
नका घालू हो इतक्यात डोळा
जीव धकधक करतोय खुळा
हिरवा गार गार झालाय मळा ,
नका घाबरू पावन 
भाव लय आलाय ऊसाला ,
बोला......
नका घाबरू पावन भाव लय आलाय ऊसाला हा 
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, 
ज्वानीचा मसाला आ... 
💃💃💃💃💃💃💃
मला कराहो आपली राणी
तुमच्या घरात भरीन पाणी,
(जी जी जीजी,हेरं जी जी जीजी)
मला कराहो आपली रानी 
तुमच्या घरात भरीन पाणी,
असं बघु नका खुळ्या वाणी
माझं बोलणं आणा हो ध्यानी
रात लय झाली हात माझा घ्या हो ऊशाला, 
घ्याकी.....
अहो, रात लय झाली हात माझा घ्या हो ऊशाला आ
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, 
ज्वानीचा मसाला
तुमच्या पुढ्यात कुटते मी हा, 
ज्वानीचा मसाला हा आ
💃💃💃💃💃💃💃💃
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment