Sunday, 1 August 2021

नाचू किती नाचू किती कंबर लचकली

(लगबग लगबग, बिगी बिगी बिगी, थुई-थुई नाचत आली)

हा...नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली

ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली
बाई माझी जोडवी टचकली

हाय..नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली....

(बाजारपेठ ही कोल्हापूरची, काय मी म्हणू हिला,
नखरेल नार ही सोळा गाठ की दिसली खरी कला)

आई गं ,नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली ईई
नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
🌷स्वर-आशा भोसले🌷
हे ज्वानीच चाललं गुऱ्हाळ 
(चाललंय गुऱ्हाळ, चाललाय गुऱ्हाळ, पोट भरलं)
बारा गावाचं जमलंय दलाल
(जमलय दलाल, जमलय दलाल, पोट भरलं)
हो...काहील भरली, उकळी फुटली
(लई जण हरकली)

हं..नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली 
ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली
बाई माझी जोडवी टचकली
हं..नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
या सुटल्या हो गाड्या कश्या हो
(गाड्या कश्या हो, गाड्या कश्या हो, पोट भरलं)
कुणी डागल्या हो, तोफा जश्या हो
(तोफा जश्या हो, तोफा जश्या हो, पोट भरलं)
हो...गाडीचा अड्डा, सुगंधी कट्टा 
(दुनिया हबकली)
हं...नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली
ठेच लागली जाता जाता, जोडवी टचकली
बाई माझी जोडवी टचकली
हं...नाचू किती नाचू किती कंबर लचकली ईई
नाचू किती नाचू किती कंबर लचकली
🙏 धन्यवाद 🙏

No comments:

Post a Comment