Monday, 16 October 2017
दिन दिन दिवाळी - लोकगीत
दिन दिन दिवाळी
गाय म्हशी ओवाळी
गाय पात चौरं
बैल नवरं
बैल कुणाचं ?
कृष्ण देवाचं
कृष्ण देवाला
दिन दिन डोळं
अंबाला सव्वा डोळं
चिंतामण मोरया
अंबिकेचं उदो उदो ।
गाय यली मोरी
गेनुबा गाय यली मोरी
मोरीला झालाय गोर्हा
गेनुबा मोरीला झालाय गोर्हा
गोर्ह्याच्या गळ्यात गेठा
गेनुबा गोर्ह्याच्या गळ्यात गेठा
गेठंला मोडलाय काटा
गेनुबा गेठंला मोडलाय काटा
काट्याकुट्याचा येळू
गेनुबा काट्याकुट्याचा येळू
बाया लागल्यात खेळू
गेनुबा बाया लागल्यात खेळूू
खेळ कुटतो खांद्या
गेनुबा खेळ कुटतो खांद्या
बैल डरंतो नंद्या
गेनुबा बैल डरतो नंद्या
नंद्या बैलाची येसन
गेनुबा नंद्या बैलाची येसन
निळ्या घोडीवर बसन
निळ्या घोडीचा खर्रा
गेनुबा निळ्या घोडीचा खरारा
बां हाक मारतो घरा
गेनुबा बां हाक मारतो घरा
घोंगडीची दशी
गेनुबा घोंगडीची दशी
गाया वेशी पाशी
गेनुबा गाया वेशी पाशी
घोंगडीचा दोरा गेनुबा
घोंगडीचा दोरा
गाया आल्यात घरा
गेनुबा गाया आल्यात घरा ...!!!
दिन दिन दिवाळी
गाय म्हशी ओवाळी ...!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment