काही प्रसंग असे रंगवलेले असतात की ऐकणार्याचे वा पाहाणार्याचे मन हेलावून जाते , काळीज पिळवटते ...
सुंबरान चित्रपटातील पुढील गित हे त्यातलेच . गिताची पार्श्वभूमी सांगितल्या शिवाय त्याला पुर्णता येणार नाही , गितातील भावना लक्षात येणार नाहीत ...
गावातील पाटलाची व तांड्यातील धनगराची मैत्री असते . पाटलाच्या मुलाचे व धनगराच्या मुलीचे प्रेम जमते . या प्रकरणाला पाटलांच्या माणसांचा विरोध असतो आणि त्यातच मुलीचा जीव जातो ...
धनगर दुःखी मनाने गाव सोडतो . ईकडे पाटलाचा मुलगा आजारी पडतो , सर्व उपाय करूनही तो बरा होत नाही . मित्राचे सुंबरान गित घरी झाल्यावर मुलगा बरा होईल याची पाटलाला खात्री असते . धनगराला निरोप जातो , स्वतः तापाने फनफनलेला असतानाही तो आपल्या जीवलगासाठी भर पावसात पुढील सुंबरान गित गाऊन मुलगा बरा व्हावा यासाठी देवाजीचा धावा करतो ....
देवा तुझ्या गुणगानी रात जागवू दे
आन् ढोल वाजवू दे तुझा ढोल वाजवू दे
दिला जन्म तो सावरे
तुझं लेकरू बावरे
रानी चुकलं पाडुस
आता देवाजी धाव रं
आता देवाजी धाव रं
आन् बारूमास झेंडा तुझा उंच नाचवू दे
धरणी घुमाया लागली
तुझी माया का भागली ?
जरी बरसती धारा
मला तडस लागली
मला तडस लागली
आन् राऊळीच्या देवा तुझा डंका गाजवू दे
आन् देवा तुझ्या गुणगानी ...
देवा तुझं सुंबरान
मांडायचो न्हाई रं
तुझ्या कुरणात माझा
तांडा याचा न्हाई रं
राऊळात बैस बाबा
तुझा माझा तुटला धागा
आता तुझ्या संग पुन्हा
भांडायचो न्हाई रं
देवा तुझं सुंबरान
मांडायचो न्हाई रं
देवा तुझं सुंबरान
मांडायचो न्हाई रं
खरं तर तो ते गाणं त्याच्या मित्रासाठी म्हणतो
ReplyDelete