१]
स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं ,
मोरेश्वरं सिध्दीतं ,
बल्लाळो मुरूडं विनायक महं,
चिंतामनी थेऊरं ,
लेण्याद्री गिरीजात्मजं सुरवरं,
विघ्नेश्वरं ओझरं,
ग्रामे रांजन संस्थितो गणपती ,
कुर्यात सदा मंगलम ...!!!
२]
सिता राम पती दिसे गजगती,
चंद्राप्रती रोहीणी ,
सावीत्री पती सत्यवान जणुकी ,
नारायणा लक्ष्मी ,
घाली रूक्मीणी मालिका सुकरे ,
स्वानंद बन्सीधरा ,
जैसे हरिश्चंद्र तारामती ,
कुर्यात सदा मंगलम ...!!!
३]
गोत्रे भिन्न परस्पराहुनी जशी ,
की भिन्न ज्यांची कुळे ,
जीवे एकची होती ती वरवधु ,
आजन्म ज्याच्या मुळे ,
ते ये ईश कृपे घडोनी सदनी ,
मांगल्य वैवाहीक ,
दांपत्य चिरनित्य शंकर कृपे ,
कुर्यात सदा मंगलम ...!!!
४]
नवर्याला मुळ चालल्या सुगरणी ,
सोडीती दारूनळे
वाजंत्री बहु वाजती चौघडे,
घोडे रथाच्या पुढे ,
अंबार्या पिवळे तसेच अवघे ,
हत्ती वरी नौबदा ,
जावाई रघुराज पुर्ण विजयी ,
कुर्यात सदा मंगलम ...!!!
५]
लाभो संतती संपदा बहु तुम्हा ,
लाभोतही सद्गुण ,
साधोनी चिरकर्म योग आपुल्या ,
व्हा बांधवा भुषण ,
सारे राष्ट्र धुरीण हेची कथिती ,
किर्ती करा उज्वल ,
गृहस्थाश्रम हा तुम्हा वधुवरा ,
कुर्यात सदा मंगलम ...!!!
६]
आली लग्न घटी समीप नवरा ,
घेऊनी यावा घरा ,
गुह्योक्ते मधुपर्क पुजन करा ,
अंत: पटाचे धरा ,
दृष्टादृष्ट वधुवरा न करीता ,
दोघं करावी ऊभी ,
वाजंत्री बहु गलबला न करणे ,
कुर्यात सदा मंगलम ....!!!